dahi vada recipe in marathi

 दही वडे   : dahi vada recipe in marathi

 

साहित्य :-

१)      दोन वाटया उडदाची डाळ

२)      पाव वाटी मुगाची डाळ

३)      तळण्यासाठी तेल

४)      चवीनुसार मीठ . 

दही असं तयार करा :-

१)      एक लिटर दुध , पाव वाटी कॉर्न फ्लॉवर , एक मोठा चमचा मिल्क पावडर .  एक लिटर दुधामधील एक वाटी दुध बाजूला काढा . 

२)      त्यात कॉर्न फ्लॉवर , मिल्क पावडर घालून पेस्ट तयार करून घ्या .  बाकीचं दुध उकळायला लागलं की ही पेस्ट दुधात ओता . 

३)      सतत ढवळत राहून पाच ते सहा मिनिटं उकळू दया .  कोमट झाल्यावर नेहमीप्रमाणे विरजण घाला .  साधारण आठ तासात विरजण लागतं . 

कृती :-

१)      उडदाची डाळ स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात चार तास भिजवा , झाकून ठेवा . 

२)      कमीत कमी पाणी घालून अगदी गंधाप्रमाणे होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून काढा . 

३)      गरम तेलात वडे तळा .  पाण्यात टाकून पिळा , दह्यात टाका . 

४)      दही रवीनं घुसळा .  त्यात मीठ , साखर , आल्याचा कीस , कोथिंबीर टाका .  पाण्यातून काढलेले वडे दह्यात टाका . 

More Posts Related to dahi vada recipe in marathi

  • dahi vada recipe in marathi
  • medu vada recipe in marathi
  • vada pav recipe in marathi
  • sabudana vada recipe in marathi
  • batata vada recipe in marathi
  • 2013 m4marathi. All rights reserved.