marathi rashi bhavishya december 2014

राशी भविष्य डिसेंबर २०१४

 

मेष: स्वास्थ्य प्रतिकूल राहिल्याने  ठरविलेली  आवश्यक कामे  न झाल्याने  आर्थिक हानी संभवते . जुना रोग उफाळून आला असेल  तर सावध व्हा . टाळाटाळी भारी पडू शकते . बढती, इच्छित जागेवर बदली ,इच्छित पदाची प्राप्ती , नवीन कंपन्याची ऑफर मिळतील.. कुटुंबात वृद्धीचे समाचार मिळतील .

वृषभ: महिन्याच्या सुरवातीस उत्साह, जोश  कायम राहील . मोठा अनुबंध  हाती आल्याने  किंवा मोठी तुंबलेली रक्कम  मिळाल्याने मनावरचा ताण कमी होईल .कापड, किरण सामान, रेडीमेड ,कॉस्मेटिक, शिक्षण  संस्था  चालविणाऱ्या व्यक्तीस व्यवसायात  प्रगती पाहून आनंद  होईल. घरात मन सम्मान वाढेल .

मिथुन: हा महिना तुमच्या साठी वरदान आहे .विशेष करून सोने-चांदी , शेअर इत्यादीमध्ये  फायदा मिळेल . विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात काही विशेष प्रगती दिसणार नाही . त्यांची एकाग्रता भंग होऊन मौज-मजा  मनोरंजन  याची प्रवृत्ती वाढेल. चाललेल्या प्रेम प्रसंगात गैरसमज होऊन  वितुष्ट येईल .निक्रीसाठी केलेले प्रयत्न  सफल होतील .

कर्क: महिनारंभी आनंद होईल . काही शुभ समाचार मिळतील . बरेच दिवस तुंबलेले पैसे पण मिळतील . शिक्षण घेत असलेली तुमची मुले  चांगली तयारी करत असलेले पाहून  मनाला संतोष मिळेल. व तन कमी होईल . एखादी यात्रा संभवते . काही विशेष कारणास्तव  केलेली यात्रा सफल होईल .

 सिंह: मासारंभी  शुभ फलदायक समाचार मिळतील .कुटुंबात आनंदी-आनंद असेल . भावामधली वाढलेली दुरी कमी होईल . मोठा भाऊ अथवा मित्राची आर्थिक सहायता करावी लागेल . राजनीतीतज्ञ लोकांसाठी काळवेळ अनुकूल असेल .

कन्या: जे काम लांबणीवर टाकलेले होते  ते कुटुंबाच्या दबावाने  आटोपावेच लागणार. मुलांच्या सोयरिकीसाठी  एखादी यात्रा करावी लागेल . लहान मोठे फायद्याचे सौदे होतील . एखाद्या मित्रासोबत  व्यापारात भागीदारीची ऑफर मिळेल.

तुला:काळवेळ अनुकूल असल्याने सर्व ठरलेली कामे  चांगल्या रीतीने पार पडल्याने  आनंद होईल. घरातील वडील मंडळी व पत्नीचे स्वास्थ्य पण बरेच अनुकूल राहील . व्यक्तीमत्त्व विकासाबरोबरच  प्रगतीची संधी पण मिळेल . व्यवसायनिमित्त यात्रा सुखद फळ देतील . व्यवसाय चांगला असेल .व पैश्याची  आवक सुद्धा चांगली असेल .

वृश्चिक: मासारंभी खर्चात वाढ होईल . ठरवून सुद्धा खर्चात कपात करता येणार नाही . पत्नी अथवा वृद्धजनाच्या स्वास्थ्यासाठी महाग तपासणी  व औषधांवर खर्च पूर्ण महिन्याचे बजेट बिघडवणार . घरी आलेल्या पाहुण्यांवरहि  खर्च करावा लागेल . त्यांच्या बरोबर प्रवास पण करावा लागेल .

 

धनु: महिन्याच्या सुखातीस  अनेक उपलब्धी मिळतील . शुभ समाचार मिळतील, विवाहित कन्या किंवा सुनेच्या  गर्भवती होण्याची बातमी  शेयर बाजार सटटा बाजार, वायदा बाजार ,सोने चांदी चे व्यापारी , एक्स्पोट-इम्पोट व्यावसायी यांना बाजारातल्या  तेजीने चांगला फायदा मिळेल .

मकर: महिन्याच्या सुरवातीस बरीच धावपळ असेल . पण त्याचा चांगला  परिणाम मिळाल्याने मन प्रसन्न राहील . स्वताच्या कामाशिवाय  इतरांच्या कामात सुद्धा गुंतावे लागेल . शेयर बाजार , सट्टा बाजार , वायदा बाजार यात तेजीमुळे  फायद्याबरोबर मोठे सौदे व गुंतवणूक करावी लागेल.

 

कुंभ: आपल्या जिभेवर ताबा ठेवा , राग काबूत ठेवा , लहान लहान गोष्टीवरून भांडण तंटे करू नका . महिन्याच्या शेवटी ग्रहांची दशा अनुकूल होता कामे सहज पार पडतील . पैशाची आवक बरी राहील . दुकानात  गिऱ्हाईकी वाढल्याने  तुमची देणी पण फेडाल.

 

मीन: महिन्याच्या आरंभी परिस्थिती  सर्व तऱ्हेने अनुकूल राहील . प्रत्येक लहान मोठी कामे अडतील . काही अंशी आर्थिक विषमता पण राहील . शेजाऱ्यांबरोबर तक्रारी  होऊ शकतात . घरातले वातावरण पण आनंदी  असेल . प्रेम-प्रसंगात पण वाढ होईल . दाम्पत्य संबंधातले तणाव संपतील . पत्नीचे सहकार्य व सानिध्य मिळेल . बढती  व इच्छिलेल्या जागेवर बढती मिळेल.  

More Posts Related to marathi rashi bhavishya december 2014

  • astrology in marathi
  • marathi bhavishya
  • horoscope in marathi
  • marathi astrology
  • marathi rashi
  • marathi horoscope
  • bhavishya in marathi
  • marathi rashi bhavishya May 2014
  • marathi janam kundali
  • janam kundali marathi