recipes of chicken

चिकन मसाला : recipes of chicken in marathi

 

साहित्य :-

१)      एक चिकन किंवा अर्धा किलो ब्रेस्ट पिसेस किंवा लेग्ज पिसेस

२)      तीन ते चार मोठे कांदे बारीक चिरलेले

३)      दोन बटाट्याचे साल काढून मोठे तुकडे

४)      एक टेबल स्पून वाटलेले आले-लसूण

५)      तीन टोमाटो , कोथिंबीर

६)      एक चाथुर्थांश चमचा हळद

७)      दोन चमचे लाल तिखट

८)      एक चमचा गरम मसाला

९)      दोन लवंगा , एक तुकडा दालचिनी

१०)  एक ते दीड वाटी तेल

११)  दोन वेलच्या , चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      चिकनचे मोठे तुकडे करून घ्यावेत .  तेलात लवंग , दालचिनी , वेलचीची फोडणी      करून त्यात कांदा टाकावा . 

२)      त्या फोडणीला सारखे परतत राहावे .  कांदा पारदर्शक तपकिरी रंगाचा झाल्यावर पाण्याचा थोडासा हबका मारावा म्हणजे कांदयाच्या रंग चांगला राहतो . 

३)      आले-लसूण , चांगले परतून मग टोमाटो टाकून पाच मिनिटे परतावे .  लाल तिखट , गरम मसाला , मीठ टाकून चांगले परतून घ्यावे . 

४)      नंतर चिकनचे तुकडे , बटाटे टाकून बराच वेळ परतावे .  मग झाकणावर पाणी ठेवून मंद शिजवावे .  रंग छान येतो . 

५)      झाकणावरचे पाणी थोडे थोडे आत टाकावे .  बेताचा रस्सा ठेवावा .  चिकन वाढताना वरून कोथिंबीर चिरून टाकावी . 

More Posts Related to recipes of chicken

  • chicken lollipop recipe in marathi
  • chicken biryani recipe in marathi language
  • marathi chicken recipes
  • butter chicken recipe
  • chicken recipes indian
  • marathi chicken recipe
  • recipes of chicken
  • recipes for chicken
  • south indian chicken recipes
  • chicken recipes marathi