snacks recipes

उत्तप्पा : uttappa snacks recipe in marathi

 

साहित्य :-

१)      दीड वाटी बारीक रवा

२)      अर्धी वाटी तांदळाचं वा डाळीचं पीठ

३)      एक वाटी ताक , तेल

४)      अर्धा चमचा बेकिंग पावडर

५)      चवीपुरतं मीठ . 

वरून घालण्यासाठी :-

१)      बारीक चिरलेला कांदा

२)      टोमाटो , आलं

३)      हिरव्या मिरच्या 

४)      कोथिंबीर यासर्वांच मिश्रण . 

कृती :-

१)      रवा , पीठ ताक आणि मीठ एकत्र करून कोमट पाण्यानं भज्याच्या     पीठाइतपत घट्टसर भिजवावं . 

२)      त्यात बेकिंग पावडर मिसळून दहा-पंधरा मिनिटं झाकून ठेवावं .

३)      नॉनस्टिक पैन किंवा तवा तापवून त्यावर थोडं तेल टाकून त्यात कांदा     घालावा आणि परतावा . 

४)      त्यावर डावभर मिश्रण घालावं आणि जाडसर पसरावं .  वर कांदा-टोमाटो इत्यादींच मिश्रण घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू दयावं . 

५)      वाफ आल्यावर वर आणि कडेनं थोडं तेल सोडून उत्तप्पा उलटावा .  खालच्या बाजूनं लालसर झाला की चटणी सोबत दयावा . 

More Posts Related to snacks recipes

  • snacks recipes
  • marathi snacks recipes
  • recipes of snacks
  • snacks
  • recipes for snacks
  • indian snacks recipes
  • indian snacks
  • indian veg snacks
  • indian snacks menu
  • pani puri recipe in marathi